तांबापूरात तोतया पत्रकाराला बदडले

0

जळगाव । तूमच्या विरुद्ध तक्रारी अर्ज आले आहे, तूमच्यावरील कारवाई थांबवायची असेल तर माझी सोय’ करा. असे सांगून एका मागून एक सहा दुकानदारांना दरडावणार्‍या या तोतया पत्रकारावर आज तांबापुरातील सदोबा वेअर हाऊस परिसरात जोरदार तडी बसल्याची घटना दुपारी चार वाजता घडली. जळगाव शहरातील तांबापुरा भागात केशरी रेशन कार्डवर धान्य, का देत नाही..तुमच्या अनेक तक्रारी आमच्या पर्यंत आल्या आहेत असे सांगत एका मागुन एक तब्बल सहा रेशन दुकानदारांना भामट्याने दरडावले. हातात फाईलचा गठ्ठा..प्रश्‍न विचारत त्याने एका मागुन एक अशा सहा स्वस्त धान्य दुकानदारांना भुलथापा दिल्या, तुमच्या विरुद्ध अनेक तक्रारी आमच्या पर्यंत आल्या आहेत..एक अर्ध्या तासात कारवाई होऊन जाईन. असे म्हणत हा भामटा राशन दुकानदारांवर धाप टाकत होता.

कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
पाच वाजेपर्यंत..माझी सोय’ करा असे सांगत आपला मोबाईनंबर सोडून संबधीत दुकानदारांना सिमेंट गोदामाजवळ त्याने बोलावले होते. घडला प्रकार अनपेक्षीत..आणि अनाकलनीय असल्याने दुकानदारांनी एकमेकांना संपर्क करुन माहिती घेतल्यावर एका मागुन एक सहा दुकानदारांकडे हा भामटा पोचला होता. त्याने बोलावलेल्या ठिकाणी सर्व दुकानदार पोचल्यावर त्याने आपल्या पदाची माहिती करुन दिली..त्याच्यावर संशय बळावल्याने त्याची झोपडपट्टी वासीयांनीच ओळखपरेड घेतल्यावर त्याने आपण पत्रकार असल्याचे व गरीबांसाठी लढा देत आहोत असे सांगत निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र तावडीत सापडल्याने त्याचे पितळ उघडे पडल्याने परिसरातील रहिवाश्यांनी त्याला मजबुत चोप दिला. तो, मेहरुण मधीलच गणेश भोपे असल्याचे ओळख पडल्यावर त्याची तक्रार करण्यात आली आहे.राशन दुकानदारांत भिती निर्माण करणारा व्यक्ती देशी दारु कसा पेऊ शकतो, या शंकेने तपशीलात चौकशी करुन त्याच्यावर लगेच पब्लीक तडी बसली. चौकशीत तो मेहरुणचाच रहिवासी असल्याचे सामोर आल्याने प्रकरण आपसांत मिटवण्यात आली