तांबापूर्‍यातील तरूणानाला मारहाण

0

जळगाव। तांबापूरा येथील तरूणाला दोघांनी मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7 वाजता घडली. पवन नारायण हटकर हा तांबापूरा परिसरातील महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला होता.

त्यानंतर सागर बापू हटकर व बबलू बापू हटकर यांनी त्याला मारहाण करीत डोक्यात लोखंडी दूधाची बरणी मारून जखमी केले. यानंतर पवन याला जिल्हा रूग्णालया उपचारार्थ दाखल करण्यात आले. अशी माहिती पवन यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.