ताजमहालच्या सौदर्याने नेतन्याहू पती-पत्नी भारावले!

0

आग्रा : इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी जगातील सातवे आश्चर्य असलेल्या ताजमहालला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्नीसोबत ताजमहालचा फेरफटकाही मारला. तसेच, छायाचित्रही काढून घेतले. 2003 नंतर भारत भेटीला आलेले बेंजामिन हे पहिलेच इस्त्राईलचे पंतप्रधान आहेत. या भेटीत त्यांनी ताज महालच्या नक्षीचीही बारकाईने पाहणी केली. ताज महालच्या सौंदर्याने दोघेही पती-पत्नी भारावून गेल्याचे दिसून आले.