पाचोरा । शहरातील शासकीय तूर खरेदी केंद्रावर आज अखेरच्या दिवशी शेतकर्यांच्या तूर खरेदीला प्राधान्य न देता. व्यापार्यांच्या तुरीची मोजणी करण्यात आली. ताटकळत ठेवलेल्या शेतकर्यांनी संतप्त होऊन केंद्रासमोरील रस्ता रोको केला. तसेच बारदान संपल्याचे कारण पुढे करण्यात आले. शेतकरी संघाकडे तूर खरेदीचे नियोजन चुकल्याने शेतकर्यांचे आतोनात हाल झाले. हे सरकार शेतकर्यांचा वाली नसून व्यापार्यांचे भले करणारे असल्याच्या भावना व्यक्त होत आहे.
तत्काळ व्यापार्यांची खरेदी बंद करीत शेतकर्यांची तूर खरेदीस सुरूवात
सदर प्रकरणाची माहीती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी भेट देत शेतकर्यांच्या समस्या जाणून घेऊन खरेदीच्या सुचना केल्या. तूर खरेदीचा आज अखेरचा दिवस होता. पाचोरा तालूक्यासह जवळपासच्या तालूक्यातील शेकडो शेतकरी आपली तूर घेऊन आले होते. सकाळी काही बोगस उतारे व्यापार्यांकडून देत त्याची तूर मोजण्याचा धाट सुरू केला. शेतकरी व डॉ.उत्तमराव महाजन यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने अधिकार्यांना धारेवर धरले. त्यांनी तत्काळ व्यापर्यांची खरेदी बंद करीत शेतकर्यांची तूर खरेदीस सुरूवात केली, नियमांचे उल्लंघन करत असल्याने शेतकर्यांनी रास्ता रोको केला. शेवटी शेतकर्यांच्या मालाची खरेदी चालु झाल्याने शेतकरी शांत झाले.
टोकन धारकांची खरेदी होणार
सदर केंद्रावरील सावळा गोंधळ संदर्भात आमदार किशोर पाटिल यांना ही बातमी कळाली त्यांनी त्वरीत खरेदी केंद्रावर भेट दिली. शेतकर्यांना संतप्त भावना जानुण घेउन सर्वच शेतकर्यांच्या तुरीची खरेदी पुर्ण केल्याशिवाय खरेदी बंद करू नये, अशा सूचना दिल्या. टोकनधारक शेतकर्यांना न्याय मिळाल्यावर खरेदी बंद होईल असे आश्वासन आमदारांनी यावेळी दिले. पाचोरा बाजार समिमीत 3200 चा तुरीचा भाव आहे. तर शासकिय खरेदी केंद्रावर 5050 चा भाव आहे. त्यामुळे व्यापारी बोगस उतारे आणुन आपले आर्थीक हीत साधत असल्याचा आरोपही यावेळी शेतकर्यांनी केला व सदर उतार्याच्या चौकशीची मागणी केली.