चंद्रपूर:चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात एक वाघिणी मृतावस्थेत आढळली. या वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून तिची शिकार करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कक्ष क्रमांक १२३ या ठिकाणी हरणे मारण्यासाठी फासे लावण्यात येते. ते फासे आढळून आल्याचे दिसत आहे. या फाशात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाला असून ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे, असे एका वन अधिकाऱ्याने सांगितले. क्षेत्रसंचालक प्रवीण एन. आर. यांच्यासह कोअर विभागाचे उपसंचालक ना. सि. लडकत यांनी घटनास्थळी भेट देऊन याची माहिती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महेश खोरे हे अधिक तपास करीत आहेत.