तात्यासाहेब गुंजाळ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन
नारायणगाव : गुंजाळ कुटुंबियांशी आमचा घरचे स्नेहसंबंध आहेत. तात्यासाहेबांचा जीवनपट हा समाजापुढे आदर्श आहे. कोणतीही व्यावसायिक, शैक्षणिक पार्श्वभुमी नसताना जयहिंदच्या नावाने विलक्षण जिद्द व कर्तव्यशक्तीने हातात घेतलेलं काम पुर्ण करण्याची जुन्नर तालुक्याची परंपरा आहे त्यामुळे तात्यांनी हे सर्व साध्य केलेलं आहे. तसेच एकेकाळी मुंबई काबीज करणारी आपण लोकं आहोत. असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जुन्नर तालुक्यातील जयहिंद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवनेरी भुषण तात्यासाहेब गुंजाळ यांचा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन व आत्मचरित्र प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला.याकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. जयहिंद या आत्मचरित्राचे प्रकाशन खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शरद सोनवणे होते. यावेळी जयहिंद प्रज्ञाशोध परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी जयहिंद या पुस्तकाचे संपादक डॉ.मिलिंद कसेब यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रत्येकाने आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व
यावेळी खा. आढळराव पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात शिक्षणाची, व्यावसायाची क्रांती घडवुन आणणारे तसेच फ्रेम मेकिंग ते शिक्षणमहर्षी असा खडतर प्रवास करत जयहिंद हा ब्रॅड महाराष्ट्रात निर्माण करणारे राजकारणातील व समाजातील प्रत्येकाने आदर्श घ्यावा असं समाजवादी व्यक्तिमत्व तात्यासाहेब आहेत.
सकारात्मक विचाराने काम करा
यावेळी सत्काराला उत्तर देताना तात्यासाहेब गुंजाळ यांनी आपल्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला आणि सकारात्क विचाराने काम केल्यास सर्व चांगल्या पद्धतीने साध्य होते. त्यासाठी तन, मन, धन झोकुन काम करा यश नक्कीच मिळते असे सांगत सर्व उपस्थितांचे मान्यवरांचे आभार मानले.