मुरबाड : तालुक्यातील उंबरपाडा येथील शेतकरी सेवा सहकारी सोसायटीच्या चेयरमन पदी तानाजी जगन्नाथ घुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हाईस चेयर मन पदी सौ. वनिता मधुकर घुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदर उंबरपाडा शेतकरी सहकारी सोसायटीच्या १३ जागा होत्या. त्यामुळे सदरची निवडणूक बिनविरोध शांतमय वातावरणात पार पडली. त्यामुळे नवनिर्वाचित चेयरमन तानाजी घुडे व व्हाईस चेयरमन सौ. वनिता घुडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.