तान्हाजीची घौडदौड सुरूच; लवकरच २०० कोटींचा टप्पा ओलांडणार !

0

मुंबई: मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित आणि अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ऐतिहासिक ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच आहे. तान्हाजी रिलीज होऊन दहा दिवस झालेत. यंदाचा हा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. दुसरीकडे दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ रिलीज होऊन दहा दिवस झालेत. या दहा दिवसांत दीपिकाच्या ‘छपाक’ला धोबीपछाड देत, अजयच्या ‘तान्हाजी’ने बराच मोठा पल्ला गाठला आहे. 200 कोटी क्लबकडे ‘तान्हाजी’ची वाटचाल सुरु आहे.

पहिल्या सहा दिवसांतच ‘तान्हाजी’ने 100 कोटींचा गल्ला जमवला. अद्यापही या चित्रपटाची घोडदौड अद्यापही सुरुच आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहिल्यानंतर त्याच्या स्पर्धेत अन्य कोणताही चित्रपट नसल्याचे दिसून येत आहे. नवव्या दिवशी या चित्रपटाने 16.36 कोटी रुपयांची कमाई केली तर दहाव्या दिवशी 22.12 कोटींचा बिझनेस केला. आत्तापर्यंत आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 167.45 कोटी रुपये झाली आहे. कमाईचा वेग असाच राहिला तर हा चित्रपट लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे.