तान्हुल्याच्या प्रेमापोटी आईने पायीच धरली एरंडोलहुन शेगावची वाट

0

जळगावात पडली बेशुद्ध : कोरोनामुळ वाहने बंद असल्याने घेतला पायी जाण्याचा निर्णय

जळगाव – कोरोणामुळे वाहनसेवा बंद अाहे. त्यामुळे माहेरी आलेली विवाहिता दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या प्रेमापाही पायीच शेगावकडे सासरी निघाली. सोमवारी जळगावात पोचल्यावर तांबापुरा परिसरातुन जात असतांना विवाहिता बेशुद्ध पडली. हिरा रमेश वाघाोले वय ३० असे विवाहितेचे नाव असुन एमआयडीसी पोलिसांनी या तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे .

आजारी वडिलांना पाहण्यासाठि अाल्या होत्या माहेरी

वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना पाहण्यासाठी शेगाव येथुन हिरा वाघोले ह्या दहा दिवसांपुर्वी माहेरी एरंडोल येथे आल्या होत्या. वडिलांना बघून दोन दिवसांनी पुन्हा त्या सासरी शेगाव येथे परतणार होत्या. यादरम्यानच्या काळात कोरोणांमुळे अचानक वाहने बंद झाली.

तान्हुल्यासाठी माय पायीच निघाली शेगाव

सासरी पतीकडे सोडुन आलेला दोन वर्षाच्या मुलगा रोज आई आई करत रडत होतो. पतीने फोनवरुन हिरा यांना याबाबत सांगितले. वाहने बंद असल्याने तान्हुल्याच्या प्रेमापोटी आई हिराने शेगावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र जळगावात पोहचल्यावर तांबापुरा परिसरातून जात असतांना अचानक हिरा या बेशुद्ध पडल्या .

पोलिसांनी दाखल केले जिल्हा रुग्णालयात

अचानक रस्त्यातच बेशुद्ध पडलेल्या महिलेबाबत तांबापुरा परिसरातील नागरिकांनी फोनवरुन एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील , विजय बाविस्कर , महिला कर्मचारी स्वप्ना येरगुंटला यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले . तिला प्यायला पाणी देऊन शुध्दीवर आल्यावर तिची विचारपूस करत तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पत्नीकडे यासाठी पतीचीही झाली पंचायत

सदरच्या प्रकाराची माहिती हिरा यांचे शेगावी असलेले पती रमेश वाघुले यांना पोलिसांनी फोनवरून कळवले आहे. मात्र वाहने बंद असल्याने जळगाव यायचे तर कसे हा प्रश्न त्यांना देखील पडला आहे. तर दुसरीकडे जळगावात दाखल असल्याने मुलाची भेट आईसोबत घडवायची कशी हा देखील प्रश्न असुन आणखीनच अडचणी वाढल्या आहेत.