तापमान वाढल्याने जनजीवन विस्कळीत

0

नंदुरबार । जिल्ह्यात मार्च हिटचा चांगलाच तडाखा जाणवू लागला असून नंदुरबारचा पारा 43 से. डिग्री इतका पोहचला आहे. यामुळे शहरातील सर्वच व्यवहारांवर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. नंदुरबार शहरासह जिल्ह्यांत 20 मार्च पर्यंत थंडी जाणवत होती. पंरतू, वातावरणात अचानक बदल झाल्याने उन्हाचा प्रचंड तीव्रता जाणवू लागली आहे. सकाळी 9 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाची धग कायम असते. जीवाला लाही लाही करून सोडणार्‍या कडक उन्हांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ही उन्हाची लाट नसली तरी उन्हाचा पारा कमालीचा चढला आहे. यामुळेच नंदुरबारचे तापमान 43 अंशापर्यंत पोहचले आहे.