भुसावळ- कंडारी, ता. भुसावळ येथील प्लॉट भागातील रहिवासी गणेश रामदुलारे परदेशी ( वय २८) या तरुणाचा कंडारी शिवारातील पाण्याच्या टाकीजवळील तापी पात्रातील डोहात बुडून मृत्यू झाला. गणेश सकाळी दहा वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी गेला होता. मात्र तो घरी परतला नाही. दुपारी त्याचे कपडे नदीपात्राजवळ आढळून आले. पाण्यात शोध घेतला असता सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान मृतदेह मिळून आला. गणेशच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे. रेल्वेचे कर्मचारी मणिराम रामदुलारे परदेशी यांचा तो लहान भाऊ होता. या प्रकरणी शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.