जळगाव । तापी पाटबंधारे महामंडळा अंतर्गत तापी-गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन कार्यालयाचा शुभारंभ मंगळवारी 2 रोजी करण्यात आले. अधीक्षक अभियंता ए.एम.सिन्हा यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या महिन्यात जलविद्युत व उपसा सिंचन कार्यालय जळगाव येथील तापी सिंचन महामंडळाचे कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली होती. हे कार्यालय पूर्वी ठाणे जिल्ह्यात कार्यरत होते. त्यानुसार मंगळवारी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.