तापी नदीकाठच्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी..

मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची आग्रही मागणी..

चोपडा(प्रतिनिधी):- तालुक्यातील तापी नदी काठावरील शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास महापुराच्या पाण्याने हिरावून घेतला असुन या शेतकऱ्यांचे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकांन्वये केलेली आहे.

हतनूर धरणाच्या वरील भागात अतिवृष्टी झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले होते. सतत दोन दिवस तापी नदीला महापूर सुरू होता. त्यामुळे तापी नदी काठावरील शेकडों हेक्टर शेतीत पाणी घुसल्याने सर्वच पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. काही गावांना पुराचा वेढा पडल्याने तेथील संपर्कही काहि काळ बंद होता. संबंधित विभागाचे अधिकारी यांनी याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. तरिही आपापल्या गावातील तापी नदी काठावरील नुकसानग्रस्तं शेतकऱ्यांनी स्वतः हजर राहून शंभर टक्के नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत, असेही आवाहन गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.