तापी नदीच्या पात्रात 50 वर्षीय इसमाची आत्महत्या

Mohadi adult commits suicide in Tapi riverbed near Kolnhavi यावल : जळगाव तालुक्यातील मोहाडी गावातील प्रौढाने यावल तालुक्यातील कोळन्हावी जवळील तापी नदीच्या पात्रात उडी घेत आत्महत्या केली. मनोज मधुकर सपकाळे (मोहाडी, ता.जळगाव) मयताचे नाव आहे. सपकाळे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. सपकाळे यांचा मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

यावल पोलिसात नोंद
कोळन्हावी गावाजवळील तापी नदी पात्रात मनोज मधुकर सपकाळे (50, रा.मोहाडी, ता.जळगाव) यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच नागरीकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आला. जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या डॉ.रेणुका भंगाळे यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.