अमळनेर । तालुक्यातील कपिलेश्वर येथे तापी नदीत बुडून पारोळ्याच्या इसमाचा मृत्य झाल्याची घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. पारोळा येथे टेलर व्यवसाय करणारे विनायक कथ्थु शिंपी (वय-50, रा. पथक गल्ली, पारोळा) हे सकाळी परोळ्याहून कपिलेश्वर आले तेथे त्यांनी दर्शन घेऊन कपडे काढून पाण्यात उडी मारली. त्यानंतर तो पाण्याबाहेर न आल्याने शोधाशोध सुरू असतांना शव पाण्यावर तरंगतांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस पाटील उमाकांत पाटील यांच्या निदर्शनास दिसून आले. 50 टक्के दृष्टी अपंगत्वाचे ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक फौजदार श्रीराम पाटील करीत आहेत.