तापी नदीपात्रात उडी घेऊन एकाची आत्महत्या

0

चोपडा । येथील परदेशी गल्लीतील 32 वर्षीय तरूणाने तापी नदी पात्रात पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपविले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार 4 रोजी रात्री 8 वाजेपुर्वी निलेश मोहन बडगुजर (निमगव्हान ता. चोपडा) या युवकाने जवळील तापी नदीवरील पुलावरून उडी मारून आपले जीवन संपविले. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेंद्र पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.