वरूळ । शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली येथील उपसरपंच व आवल माता भूजलाशयीन मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सद्स्य यांनी तापी नदीत झालेला व चाललेला अवैद्य उपसा संदर्भात वाळू माफियावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा म्हणून अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. अंतुर्ली व जवखेडा शिवारातील तापी नदीपात्रात गेल्या 7-8 वर्षांपासून अवैद्यरित्या वाळू तस्करी करणारा हिसपूर ता.शिंदखेडा येथील रहिवासी वाळू माफिया भिका पाटील याच्या विरोधात अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
अवैद्य वाळू उपसाकरून लाखोंचा महसूल बुडविला
या निवेदनात संस्थेने म्हटले आहे की, भिका पाटील हा गेल्या 7-8 वर्षापासून दादागिरीने व गुंड प्रवृत्तीच्या लोकांमार्फत अंतुर्ली व जवखेडा शिवारातील तापी नदीपात्रात बेकायदेशीर रीत्या अवैद्य वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडउन वाळू तस्करी करत आहे. या सततच्या वाळू उपश्यामुळे नदीपात्र 20-25 फूट खोल झाल्यामुळे नदी्पात्रात मच्छीमार करणेसाठीे धोकेदायक झाले आहे. यामुळे मच्छीमार करणार्या आम्हा आदिवासी मच्छीमार लोकांवर उपासमारीची वेळ आली असून सदर नादीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण मोजमाप करून या अवैद्य व बेकायदेशीर वाळू उपसा करणारा भिका पाटील वाळू माफियावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात यावी. भिका पाटील यांच्यावर कार्यवाही करण्यात आली नाहीतर शिरपूर प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी आवल माता प्राथ.भुजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण शिरसाठ,उपाध्यक्ष अशोक धना भिल, सचिव विठ्ठल दगा भिल, संचालक भोजू सुकलाल भिल,तसेच ज्ञानेश्वर भिल,प्रवीण अभिमन शिरसाठ,मूलचंद शिरसाठ,भैय्या शिरसाठ,राघो शिरसाठ उपस्थित होते.