तळोदा । तळोदा तापी नदीवरील बहुचर्चित हातोडा पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केली. नगरसेवक अजय परदेशी, राजेंद्र राजपूत ,विलास डामरे, हेमलाल मगरे, डॉ स्वप्नील बेसाने, भास्कर मराठे उपस्थित होते. हातोडा पुलाच्या पाहणीसाठी पाहणी केली. काम अंतिम टप्प्यात असून जुलै अखेर काम पूर्ण होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. काम पूर्ण करण्याचे निर्देश आ.पाडवी यांनी यावेळी दिले.
अनेक गावे मुख्यालयाशी जोडली जाणार
पुलाला एकूण 58 कोटी 40लाख निधी खर्च करण्यात येणार आहे. तळोदा, धडगांव तालुक्यातील गावे जिल्हा मुख्यालयास जोडला जावा. जनतेचा वेळ पैसे वाचावा म्हणून गुजरात हद्दीत महाराष्ट्र शासनाने या पुलाला निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर पुलाचे काम राजदीप बिल्डकाँ न प्रा ली अहमदनगर यांना देण्यात आले आहे. पुलाचा कामाची मुदत वेळोवेळी नदीत असलेल्या पाण्यामुळे वाढवून घ्यावी लागली आहे. नदीत पावसाळा व हिवाळ्यादरम्यान भरपूर पाणीसाठा असतो. त्यामुळे ठेकेदाराला काम करणे सोयीचे नसते फक्त उन्हाळ्यातील तीन चार महिने काम करण्यात येते या कामाचा कालावधी सण 2009 ते 2011 पावसाळ्यासह देण्यात आला होता पुन्हा 2011 -12 कालावधी वाढविण्यात आला. मोठ्या प्रमाणावर असलेल्या पाणी साठ्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही.