तापी नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

0

भुसावळ । पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तापी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ईश्‍वर किसन इंगळे (21, राहुल नगर, भुसावळ) असे मयत युवकाचे नाव आहे. ईश्‍वर हा युवक मिस्तरी काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी दुपारी तीन वाजता तो कामावर न जाता तापी पात्रावर पोहण्यासाठी गेला व पोहतानाच त्याचा बुडाल्याने मृत्यू झाला.

रविवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास जुन्या पुलाखाली तापी पात्रात त्याचा मृतदेह तरंगताना आढळल्याने पोहणार्‍यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक सारीका खैरनार, उपनिरीक्षक के.टी.सुरळकर, एएसआय फारूक शेख, संजय बडगुजर, सी.जी.गाडगीळ आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जीव रक्षक दलाचे रितेश बिजलपुरे, अनिल पवार, विजय बागले, प्रकाश वाघ, गणेश पवार यांनी मृतदेह बाहेर काढण्याकामी सहकार्य केले. किशोर धुडकू सोनवणे यांच्या खबरीनुसार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्‍चात आई व भाऊ असा परीवार आहे.