अन्यथा उपोषण; उपनिबंधकांना इशारा
जळगाव । महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या चोपडा येथील तापी सहकारी पतपेढीच्या ठेविदारांना त्यांच्या ठेवी शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रचलीत व्याजदरासह महिनाभरात परत करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण करण्यात येईल, असा इशारा जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांना एका निवेदनाद्वारे दिला.
संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीला नविन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात तापी सहकारी पतपेढीच्या ठेवीदारांची सहविचार सभा घेण्यात आली. सभेत १२५ ते १५० ठेवीदारांची तपशिलवार यादी तयार करण्यात आली. या ठेवीदारांचे सुमारे १ कोटी रूपये सव्याज परत करण्याच्या उपाययोजना व्हाव्यात, संस्थेच्या कर्जवसुली व मालमत्ता विक्रीच्या आलेल्या निधीतून ठेवीदारांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन उपनिबंधकांना देण्यात आले.
यांनी दिले निवेदन
सप्टेंबर अखेर पर्यंत ठेवीदारांना ठेवी परत मिळतील असे आश्वासन उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिले.यावेळी डी.टी. नेटके, यशवंत गाजरे, भास्कर चौधरी, किरण वाघ, धनराज सुर्यवंशी, पौर्णिमा महाजन, प्रभाकर साळुंखे, अनिता राणे, अभिषेक चौधरी, जागृती मितल, चंद्रकांत तळेले, शरद ठोंबरे, किरण राणे, अनिल भंगाळे, पांडूरंग सोनार, कमल भिरूड, निर्मला चौधरी मालती सोनार, प्रभाकर पाटील, सुभद्रा पिंगळे आदी ठेवीदार उपस्थित होते.