शिरपूर । तालुक्यातील तापी नदी पात्रातील सावळदे खुर्दे आणि उपरपिंड येथील वाळू ठेकेदार बेकायदेशीर उपसा आणि वाहतूक करीत असल्याच्या कारणावरून भाजयुमोतर्फे 17 मार्चपासुन शिरपूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी तहसीलदारांतर्फे चर्चेसाठी आलेल्या अधिकार्यांना जिल्हाध्यक्ष बबन चौधरी,नगरसेवक राजेंद्र गिरास,हेमंत पाटील,हेमराज राजपूत आदिंनी वाळु ठेक्यात तहसीलदार पार्टनर असल्याचा आरोप करीत माघारी पाठविले आहे.
बेकायदेशीर वाहतुकीने पर्यावरणाचा होतोय र्हास
उपोषणाचा दुसरा दिवस असुन याकडे जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, तहसिलदारांसह पोलिस अधिकारी व लोकप्रतिनिधिंनी सुध्दा लक्ष दिल नसुन शासनाने लक्ष द्यावे अशी भावना व्यक्त होत आहे. तापी काठावरील सावळदे, उप्परपिंड, खर्दे खुर्द(पाथर्डे) येथे नियमबाह्य वाळू उत्खनन सुरु असुन नदीपात्रात बोटी टाकुन वाळु उपसा सुरु आहे. गावाचे नदी पात्रातील वाळु उत्खनन शासकीय नियमांच्या बाहेर आहे. काही ठिकाणी पोकलॅन्डचा वापर करुनही वाळु काढली जाते. वाळुचा वाहतुकीतही अनेक गैरप्रकार चालतात असा अरोप उपोषकर्त्यांनी केला आहे. कंटेनर, डंपरसारख्या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वाळु भरुन पाठवली जाते. तापी काठावरील ठिय्यांवर दिवसरात्र बेकायदेशीर वाहतुक सुरु आहे. या वाहतुकीमुळे गावांलगतचे रस्तेही खराब होत असुन अपघातांची शक्याताही वाढली आहे. नदीपात्र गावलगतच्या शेती परिसराचे पर्यावरण संतुलन ढासळले असुन,आगामी काळात मोठे नैसर्गिक संकट ओढवण्याची भीती आहे. तसेच शासकिय नियमानुसार सुर्योदयापासुन ते सुर्यास्तापर्यंत असते याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली.
तहसिलदार तस्करांना पाठिशी घालत आहेत
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी यांनी सदर वाळू ठेक्यांमध्ये तहसीलदार महेश शेलार हे नातेवाईकांच्या नावावर पार्टनर असल्याचा आरोप केला. स्वताची भागीदारी असल्याने तहसीलदार वाळू तस्करांना पाठीशी घालत आहेत. ते पुढे म्हणाले की, ठेका घेतला म्हणून संपुर्ण वाळू उपसून टाकायची का? गरजेपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू उपसून वाहतूक होत असतांना प्रशासन काय करीत होते. अशा प्रश्नांचा भडीमार करून बेकायदेशीर वाळू उपसा बंद करून बोटी,पोकलेन जप्त केले नाही जात तोवर उपोषण सुरूच राहल असा पवित्रा भाजयुमोने घेतला असल्याचे यावेळी ते बोलत होते.
यांनी दिला पाठिंबा
उपोषणाला नगरसेवक मोहन पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक हेमंत पाटील,जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी,जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, जिल्ह कोषध्यक्ष आबा धाकड, भाजपा अनु जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, नगर सेवक राजेंद्रसिंग गिरासे, चंदनसिंग राजपुत, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपुत, भाजपा तालुका सरचिटणीस दिपक ठाकुर, देवेंद्र देशमुख, डॉ मनोज महाजन, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, उपाध्यक्ष रोहीत शेटे, प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, अविनास शिंपी, रहीम खाटीक, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, जिल्हा चिटणीस जाकीर तेली, अरमान मिस्त्ररी, भाजपा व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, संदीप करंके, रविंद्र भोई यांनी भेट देवून पाठींबा दिला आहे.
अशा आहेत मागण्या
संबधीत ठेकेदारांकडून अतिरिक्त यंत्रसामुग्री,बोटी जप्त कराव्यात, वाळू उपसा व वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, बेकायदेशीर वाहतूक करणार्या वाहनांवर आरटीओमार्फत कठोर कारवाई करावी, ठेका देतांना निर्धारीत केलेल्या क्षेत्राची तपासणी करून अतिरिक्त क्षेत्रात अतिक्रमण करून केलेल्या उपशाबद्दल ठेकेदारांकडून दंड वसुल करावा किंवा त्यांचा ठेका रद्द करण्यात यावा,कार्यकर्त्यांना धमकी देणार्या गुंडावर कठोर कारवाई व्हावी अशा मागण्या करून त्यांची तातडीने पुर्तता करावी अन्यथा बेमुदत उपोषण सुरूच ठेवले जाईल असे यावेळी जाहीर करण्यात आले. उपोषणात भाजयुमोचे शहराध्यक्ष विक्की चौधरी,राधेशाम चौधरी,अनिल राजपूत,शुभम शिरसाठ,सागर सुतार,गोपाल बारी, योगेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.