तापी पात्रातून अवैध वाळू उत्खननाची चौकशीची मागणी

0

शिरपुर । शिरपुर तालूक्यातील तापी नदीपात्रातुन होणारा अवैध उत्खननाची चौकशी करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चातर्फै एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी, तहसिलदार,प्रातंधिकारी यांचाकडे करण्यात आली होती. बेकायदेशीर वाळूचा उपसा आणि वाहतुकीविरोधात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शहराध्यक्ष चेतन (विक्की) चौधरी यांचासह पदाधिकारींनी 13 फेब्रुवारी रोजी निवेदन देवुन चौकशी करण्याची मागणी केली होती. यामागणीचे अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही म्हणुन 17 मार्च पासुन तहसिलदार कार्यालय आवारात उपोषणाला बसले असुन या उपोषणाचा सोमवारी 20 मार्च रोजी उपोषणाचा पाचवा दिवस असुन आतापर्यंत वरिष्ठ अधिकारींनी लक्ष दिल नसुन उपोषण करत्या कार्यकर्ताची तब्येत खालावरी असुन चेतन चौधरी याची तब्येतची तपासणी येथील कॉटेज हॉस्टीलचे डॉक्टारानी केली आहे.

उपोषणाचा पाचवा दिवस आल्यानंतर नागरीकांमध्ये प्रशासनाबाबत प्रश्‍नचिन्ह
जिल्ह्यात भाजपाचे दोन मंत्री, खासदार, आमदार, राज्यात व केंद्रात सरकार असुन जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, तहसिलदार यांनी लक्ष दिले नसुन मंञी, खासदार, आमदार, सरकार लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी तर तहसिलदार महेश शेलार हेच वाळू ठेकात सहभागी असल्याचा आरोप केला असून त्यांनी या उपोषणाला जिल्हा भाजपाचा पाठींबा दिला आहे. तापी काठावरील सावळदे, उप्परपिंड, खर्दे खुर्द(पाथर्डे) येथे नियमबाह्य वाळू उत्खनन सुरु असुन नदीपाञात बोटी टाकुन वाळु उपसा सुरु आहे. गावाचे नदी पात्रातील वाळु उत्खनन शासकीय नियमांच्या बाहेर आहे.

उपोषणाला शहरातील विविध संघटनांनी दिला पाठिंबा
या उपोषणाला नगरसेवक मोहन पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक हेमंत पाटील, तालुका प्रभारी डॉ जितेंद्र ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, मिलींद पाटील,जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, जिल्ह कोषध्यक्ष आबा धाकड, भाजपा अनुजाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन.डी.पाटील, नगर सेवक राजेंद्रसिंग गिरासे, चंदनसिंग राजपुत, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपुत, भाजपा ता सरचिटणीस दिपक ठाकुर, देवेंद्र देशमुख, डॉ.मनोज महाजन, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, उपाध्यक्ष रोहीत शेटे, प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी,रहीम खाटीक आदी संघटनांनी पाठींबा दिला आहे.