तापी-पुर्णा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0

मुक्ताईनगर। येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनची कार्यकारिणी मासिक सभा नुकतीच अध्यक्ष एस.एम. उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी दरवर्षाप्रमाणे फाऊंडेशनतर्फे विविध पुरस्काराचे आयोजन केले जाते. यावर्षी सन 2016-17 या वर्षात प्रकाशित कथा, काव्य, कादंबरी, बालकादंबरी, बालकाव्य, ललित लेख व व्यक्तिरेखा यासाठी तसेच उत्कृष्ट निवेदक, वक्ता, आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकार, उत्कृष्ट संशोधक, समाजसेवक या क्षेत्रात तापी पुर्णा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी 15 ऑगस्टपर्यंत स्वतंत्र प्रस्ताव अध्यक्ष उज्जैनकर, निंबाजी हिवरकर यांच्याकडे पाठविण्याचे आवाहन सचिव प्रमोद पिवटे, सहसचिव राजेंद्र सवळे, शिवा गोरले, एस.डी. ठाकुर, रविंद्रसिंग राजपूत, संगिता उज्जैनकर, जयश्री भोंबे, सुधाकर पाटील, नितीन भोंबे यांनी केले आहे. आलेल्या प्रस्तावांवर फाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण समितीतर्फे पडताळणी करण्यात येवून विविध क्षेत्रातील आदर्श कार्य करणार्‍या व्यक्तिंना पुरस्कार दिला जाणार आहे.