तामसवाडीच्या तरुणीला फूस लावून पळवले

0

रावेर- तालुक्यातील तामसवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीस कुणीतरी अज्ञात तरुणाने पळवून नेल्याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत तरुणीच्या आईने या प्रकरणी रावेर पोलिसात तक्रार नोंदवली आहे. 5 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तक्रारदाराच्या मुलीला कुणीतरी अज्ञाताने फूस लावून, आमिष दाखवून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास उपनिरीक्षक मनोहर जाधव करीत आहेत.