पारोळा : घर बंद असल्याची संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली. तालुक्यातील तामसवाडी येथे बंद घरातून चोरट्यांनी रोकड, दागिने तसेच महागड्या साड्या मिळून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर
तामसवाडी गावातील साईबाबा चौकात रावसाहेब साहेबराव बेडीस्कर (50) हे कुटुंबियासह वास्तव्यास असून शुक्रवार, 3 डिसेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी व कोयंडा तोडून घरात ठेवलेले 35 हजाराची रोकड, एक लाख 60 हजार रूपये किंमतीचे दागिने आणि पाच हजार रुपये किंमतीच्या महागड्या साड्या मिळून दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी रावसाहेब बेडीस्कर यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.