तामिळनाडुतील विद्यार्थ्यांना नीटमधून वगळणार

0

चेन्नई : एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षा तामिळनाडूमध्ये एक वर्षासाठी आवश्यक नसेल असा अध्यादेश सरकार काढणार आहे. तामिलनाडुच्या आरोग्य मंत्री सी विजय भास्कर यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नीट परीक्षेमुळे तामिळनाडुतील ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असे केंद्र सरकारला राज्य सरकारने कळविले आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री निर्मला सितारामन यांनी या विनंतीचा विचार सरकार करीत आहे. तामिळनाडू सरकारची मागणी केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशापुरती आहे आणि ती एक वर्षासाठी आहे, असे सितारामन यांनी सांगितले. तामिळनाडु विधानसभेने तसे ठराव पास केले आहेत आणि ते केंद्राकडे पाठविले आहेत. अशा अध्यादेशांना राज्यापालांची आणि केंद्रिय गृह विभागाची परवानगी आवश्यक असते.