चेन्नई: कोरोनाचे कहर सुरूच आहे. दरम्यान तामिळनाडूचे कृषीमंत्री अद्रुमकचे नेते आर. दोराईकन्नू यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशीरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, ते ७२ वर्षांचे होते. १३ ऑक्टोबर रोजी त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत.
करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरावदिंदन सेल्वराज यांनी मेडिकल बुलेटिनदरम्यान त्यांचा शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता मृत्यू झाल्याचे जाहीर केले. आर. दोराईकन्नू यांच्या सीटी स्कॅनमध्ये ९० टक्के फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यांना ईसीएमओ आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.