भुसावळ- रेल्वेत चोरी करून बसने पसार होण्याच्या उद्देशात असलेल्या तामिळनाडूतील चौघा चोरट्यांनी लोहमार्ग पोलिसांनी संशयावरून अटक केली. महेंद्र सत्यमूर्ती, मदन कुमार महेंद्रन, शिवा राजन आणि राजा आर. मुगल (रा.सर्व चिपळी, तामिळनाडू) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गोरखपूर-पनवेल एक्सप्रेसच्या एसी कोचमधून आरोपींनी पर्स लांबवली. शनिवारी सकाळी नऊ वाजता आरोपी बसस्थानकाकडे जात असताना लोहमार्ग पोलिसांनी त्यांना संशयावरून पकडल्यानंतर चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीची अंगठी व 22 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आढळून आला.