तामीळनाडूतील टोळीतील संशयीतांना सहा दिवसांची पोलिस कोठडी

0

भुसावळ- गोरखपूर पनवेल एक्सप्रेसच्या एसी कोचमधून पर्स घेऊन पळणार्‍या तामीळनाडू राज्यातील चार युवकांना लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी अटक केली त्यांच्या ताब्यातून 42 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. असून त्यांना आता पोलिसांनी महानगरी एक्स्प्रेसमधील चोरीच्या गुन्ह्यात वर्ग केले आहे. त्यांना न्यायालयाने सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गोरखपुर पनवेल एक्सप्रेस गाडी आली असता या गाडीच्या एसी कोच मधील एका महिलेची पर्स घेऊन पसार होणार्‍या चार संशयीतांना जीआरपी पोलिसांनी बस स्थानकाकडे जात असताना ताब्यात घेतले, त्यांच्याकडून चोरीतील 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांनी संशयीत महेंद्र सत्यमूर्ति, मदन कुमार महेंद्रन, शिवा राजन आणि राजा आर मुगल (सर्व राहणार दि चिपळी तामिळनाडू) यांना 16 ऑक्टोबर रोजी महानगरी एक्स्प्रेस या गाडीत 1 लाख 70 हजार रूपयांच्या झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात वर्ग केले आहे, त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना रविवारपर्यत (दि. 28) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. महानगरी एक्स्प्रेस मध्ये झालेल्या चोरीत पाच हजाराची रोख ऱक्कम होती तर 1 लाख 65 हजार रुपयांचे दागिणे होते. याप्रकरणी अटक केलेल्या संशयीतांकडून कसून चौकशी केली जात आहे. पोलिस निरीक्षक दिलीप गढरी तपास करीत असून त्यांना सहायक पोलिस निरीक्षक चिंतामण अहिरे, उपनिरीक्षक नारायण शिरसाठ, सहाय्यक फौजदार मधुकर न्हावकर हे सहकार्य करीत आहे.