मुळशी । ताम्हिणी परिसरातील पिंपरी आंतरबन येथे ट्रेकींगसाठी गेलेले दोघे ताम्हिणी घाटाची ओघळ पार करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान घडली. वाहून गेलेले दोघेही पुण्यातील खराडी परिसरातील आयटी पार्कमध्ये कामाला होते. राहुल उमाटे (वय 32) आणि सागर सुभाष दुध (वय 34) अशी त्यांची नावे आहेत.
राहुल आणि सागर एका मित्राबरोबर वर्षाविहारासाठी आंध्रबन परिसरात आले होते. दरम्यान ताम्हिणी घाटाची ओघळ पार करताना राहुल आणि सागर या दोघांचा पाय घसरल्याने ते प्रवाहासोबत वाहून गेले. ताम्हिणीतून जाणारी ही ओघळ थेट भीरा धरणाला मिळत असल्याने त्यांचा शोध आता धरण परिसरात सुरू आहे.