तारखेवर हजर न केल्याने कैद्याचे स्वत:च्या हातावर वार !

0

जळगाव: खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या कैद्याने न्यायालयात तारखेवर हजर न केल्याच्या रागातून स्वत:च्या दोन्ही हातांवर वार केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. कारागृहात ही घटना घडली. रविसिंग मायासिंग बावरी असे कैद्याचे नाव आहे. रविसिंग हा रामानंद पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्हातील आरोपी आहे. २०१७ पासून तो कारागृहात आहे. दरम्यान आज त्यांनी स्वत:वर वार करून घेतले. दरम्यान या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.