अत्याधुनिक यंत्रणेसाठी आंतराष्ट्रीय कंपनीला काम
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतर्फे तारांगण प्रकल्प इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून, त्यात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. टू डी-ऑप्टो मॅकेनिकल यंत्रणा बसविणे, त्याची देखभाल दुरुस्ती आणि प्रशिक्षित मनुष्यबळासह संचलन करणे आदी कामांसाठी आंतरराष्ट्रीय कंपनीला ठेका देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कामाचे बिलही अमेरिकी चलन अर्थात डॉलरमध्ये मोजण्यात कामासाठी गोटोइन्क प्लॅनेटेरियम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 14 लाख 30 हजार अमेरिकी डॉलर म्हणजेच 9 कोटी 73 लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच देखभाल दुरूस्तीसाठी 80 लाख रुपये मोजले जाणार आहेत.
आजअखेर 15 कोटी खर्च
पिंपरी-चिंचवड शहरासाठी पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात सायन्स सेंटर, बालनगरी, तारांगण यांना प्रमुख स्थान देण्यात आले आहे. यापैकी एक एकर जागेवर उभारलेल्या सायन्स सेंटरचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले आहे. या सायन्स सेंटरच्या बाजूलाच तारांगण प्रकल्प उभारण्यात येत आहे. मुंबई येथील नेहरू तारांगणाच्या पार्कमध्ये तारांगण साकारले जात आहे. त्याच्या बांधकामासाठी 15 कोटी रुपये खर्च झाला आहे.
वातानुकुलीत वातावरण
अंतराळ क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांनी स्थान निर्माण करावे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभागही मोलाचा असावा, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये तारांगण उभारण्यात येत आहे. अंतराळातील ग्रह-तार्यांविषयी असलेले कुतूहल, समज-गैरसमज, नानाविध कोडी उलगडून दाखविण्यासाठी तारांगण प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो. संपूर्णपणे वातानुकूलित असणार्या या तारांगणात 150 बैठक व्यवस्था असून आहे. याशिवाय या तारांगणावर 15 मीटर व्यासाचा गोलाकार घुमट असून, त्याचा सांगाडा लोखंडी आहे. त्यावर आधुनिक काचेचे आवरण बसवण्यात येणार आहे.
तारांगण प्रकल्पाच्या 14 कोटी 64 लाख 32 हजार रुपये खर्चाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. तर, तिसर्यांदा केवळ एकच निविदा भरली गेली. कंत्राटदाराने 8 टक्के जादा दराने ही निवदा भरली. त्यामुळे निविदेचा विषय यापूर्वी चांगलाच गाजला होता. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून पी. के. दास अॅण्ड असोिएशनची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी सल्लागाराला प्रकल्प किमतीच्या 1.35 टक्के शुल्क देण्यात आले आहे.