तारांचा स्पर्श झाल्याने चारा ट्रकला आग

0

चाळीसगाव । तालुक्यातील पोहरे येथील बसस्थानकाजवळ येत असलेल्या चार्‍याने भरलेल्या आयशर ट्रकला तारांचा स्पर्श झाल्याने आग लागल्याची घटना समोर आली आहे. तारांच्या स्पर्शाने आयशर ट्रकला आग लागल्याचे ट्रक चालकाला समजताच त्याने ट्रक सरळ स्मशानभूमीजवळ असलेल्या नाल्यात उतरवला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ट्रकला आग लागल्याचे कळताच गावातील ग्रामस्थांसह तरूणांनी धाव घेवून ट्रक विझविण्यास मदत केली.