आसामी, राजस्थानी, कोळी, मल्हार, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण
पिंपरी चिंचवड ः चिंचवड येथील सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जैवविवधता व आघारकर संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. पी. एन. सिंह उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. रसिकलाल माणिकचंद नहार होते. इयत्ता आठवी ते दहावी विभागाच्या स्नेहसंमेलनाची सुरूवात ईशस्तवन, नवकार महामंत्र व दीपप्रज्वलनाने झाली. प्रशालेच्या प्राचार्या चंद्रकला बोरा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वार्षिक गुणवत्ता वाढ व विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. मनीषा कलशेट्टी यांनी प्रशालेतील विविध उपक्रमांचे सादरीकरण पीपीटीच्या माध्यमातून केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सारंगा भारती यांनी करून दिला.
मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण…