अफगाणिस्तान । तालिबानी नेता मुल्ला हैबतुल्ला अखूंदजदा याच्या मुलाने अफगानिस्तानच्या हेलमंद भागात आत्मघातकी हल्ला केला आणि स्वतःला उडवून दिले. एका चोरलेल्या गाडीत स्फोटके भरून सैन्याचे तळ असलेल्या शहर भागात अब्दुर रहमान उर्फ हाफिज खालिद (23) पोहचला आणि त्याने स्वतःच्या गाडीला उडवून दिले. तालिबान , दक्षिण अफगानिस्तानचे मुख्य प्रवक्ता कारी यूसुफ अहमदी यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत अनेक तालिबानी कमांडर यांच्या नातेवाईकांनी आणि ओळखीतल्या लोकांनी असे आत्मघाती हल्ले केले. मात्र एका तालिबानी नेत्याच्या मुलाने स्वतः हा धोका पत्करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वडिल तालीबानीप्रमुख होण्याआधीच अब्दुर संपला
अब्दुर आत्मबलिदान देऊन त्याच्या कार्यात यश मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अब्दुर रहमान अद्याप मदरसामध्ये शिकत होता. मुल्ला हैबतुल्ला यांनी मी 2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या ड्रोन हल्ल्यात अख्तर मुहम्मद मंसूर याला मारले गेल्यावर तालिबानची धुरा सांभाळली आहे. आपल्या वडिलांच्या प्रमुख बनण्याआधीच आत्मघातकी हल्ला करण्याची इच्छा अब्दुर रहमान याने बोलून दाखवली होती. हेलमंद प्रातांत सेना आणि तालिबान यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे.