तालुकास्तरिय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत वडजी विद्यालयाला उपविजेतेपद

भडगाव : प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा कार्यालय आणि तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथील क्रीडांगणावर भडगाव तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या .या स्पर्धेत वडजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला उपविजेतेपद मिळाले. तालुकास्तरिय 19 वर्षाआतील मुलींच्या गटातील स्पर्धेत वडजी येथील टी. आर. पाटील विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला तर आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला .

स्पर्धा यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा समन्वयक प्रा.सचिन भोसले यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षकांनी मेहनत घेतली. वडजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाला उपविजेतेपद मिळाल्यामुळे किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील ,किसान शिक्षण संस्थेच्या सचिव ताईसाहेब पूनम प्रशांत पाटील, संस्थेचे संचालक दादासाहेब प्रशांत विनायक पाटील ,वडजी विद्यालयाचे प्राचार्य बी.जे. पाटील , एस .जे . पाटील , राकेश पाटील यांचेसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिलेल्या आहेत