रावेर। येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर रावेर येथे तालुकस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व कमलाबाई गर्ल्स हायस्कूल ने वर्चस्व मिळवले. स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे शालेय तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात 14 वर्ष, 17 वर्ष, व 19 वर्ष वयोगतातील विद्यार्थीनीनी सहभाग नोंदवला. यात तालुक्यातील सावदा, मस्कावद, खिरोदा, तांदलवाडी, कुसुम्बा, रावेर इत्यादि ठिकाणच्या शाळानी सहभाग नोंदवाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र पवार यांनी नाणेफेक करुन स्पर्धेला सुरवात केली. तर स्पर्धेचे उद्घाटन भीमराव खोडके यानी केले.
19 वर्ष वयोगट स्पर्धेत जी.जी. हायस्कुलची बाजी
सुरवातीला 14 वर्ष वयोगतातील स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्या मंदिराने यशस्वी कामगिरी करत मॉडर्न इंग्लिश स्कुलला नमवत अजिंक्यपद मिळवले तर दुसर्या टप्प्यातील 17 वर्ष वयोगटातील स्पर्धेत ही स्वामी विवेकानंद विद्या मंदिराच्या विद्यार्थीनींनी दबदबा कायम राखत कमलाबाई गर्ल्स हायस्कूलला मागे टाकत विजेते पद मिळवले. यानंतर 19 वर्ष वयोगटातील स्पर्धेत सरदार जी.जी. हायस्कुलने बाजी मारली. यशस्वी संघाना रविंद्र पवार यांचेहस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. तर पंच म्हणून ए.पी. पाटील, जे.व्ही. तायडे, रमण तायडे, जे.के. पाटील, मनीष दुबे, एस.पी. चौधरी यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आनंद सपकाळ, श्रीकांत महाजन व सहकार्यांनी परिश्रम घेतले.