तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

0

नारायणगाव । जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा गुरूवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरात पार पडल्या. या स्पर्धेत ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी शाळेतील 16 खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. यापैकी 6 खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक एच.पी.नरसुडे यांनी दिली.

सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्याध्यापक एच.पी.नरसुडे, क्रीडाशिक्षक ए.बी.कानडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार ग्रामोन्नती मंडळाचे अध्यख प्रकाश पाटे, उपाध्यक्ष सुरेश संचेती, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, कार्यवाह रविंद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, विद्यालयाचे चेअरमन आल्हाद खैरे, गुंजाळवाडीचे सरपंच युवराज शिंदे, उपसरपंच श्रीकांत वायकर, मुक्तादेवी पतसंस्थेचे चेअरमन सोपान शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शरद वायकर, उपाध्यक्ष अरविंद वायकर यांच्या हस्ते करण्यात आला.

कुस्ती स्पर्धा विजेते
औदुंबर ज्ञानेश्वर ढवळे (35 किलो फ्री स्टाइल), ओंकार गणेश ढवळे (42 किलो ग्रीको), संकेत रामदास वाणी (42 किलो फ्री स्टाइल), संग्राम श्रीधर गुळवे (52 किलो ग्रीको), सिध्देश किरण सोलाट (58 किलो ग्रीको), अभिषेक शरद डोंगरे (58 किलो फ्री स्टाइल), द्वितीय- जीवन दिलीप बेलवटे (45 किलो फ्री स्टाइल), सौरभ रामदास काळे (50 किलो ग्रीको), तृतीय- देवेश संजय दरेकर (46 किलो ग्रीको), युवराज काशिनाथ दरेकर (38 किलो फ्री स्टाइल), तजेस ज्ञानेश्वर ढवळे (48 किलो फ्री स्टाइल), षिकेश रमेश शिंदे (54 किलो फ्री स्टाइल), योगेश मारूती जेडगुले (46 किलो फ्री स्टाइल), आझाद रविंद्र तोडकर (49 किलो फ्री स्टाइल), तन्मय गणेश मुळे (41 किलो फ्री स्टाइल), खंडू कोंडाजी दरेकर (46 किलो फ्री स्टाइल).