तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बियाणी मिलीटरी स्कुलचे यश

0

भुसावळ । येथील बियाणी मिलीटरी स्कुलमध्ये तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा समन्वयक रमण भोळे, प्राचार्य डी.एम.पाटील, आर.आर.धनगर, प्रदीप साखरे, माया कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. 14 वर्षीय मुलींच्या वयोगटात रेहाना तडवी हिने प्रथम क्रमांक पटकावला. 400 मीटरमध्ये शितल बारेला प्रथम, नेहा बारेला द्वितीय, 600 मीटरमध्ये लक्ष्मी पारधी प्रथम, सानिया तडवी द्वितीय तर लांबउडीत शितल बारेला हिने द्वितीय क्रमांक पटकावला. थाळीफेक स्पर्धेत सायली वानखेडे हिने प्रथम क्रमांक मिळवला. चालण्याच्या स्पर्धेत 14 वर्षीय मुलांच्या वयोगटातून मोहम्मद तडवी प्रथम, 200 मीटरमध्ये अख्तरसिंग पावरा प्रथम, 400 मीटरमध्ये अमर बारेला याने प्रथम क्रमांक मिळवला.

थाळीफेकमध्ये जावेद तडवी याने प्रथम तर अमर बारेला याने द्वितीय क्रमांक पटकावला. भालाफेक स्पर्धेत उमेश कोल्हे याने यश मिळवले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डी.एम.पाटील व क्रीडाशिक्षक नरेंद्र म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.