१९ मुलींचे तर ३४ संघ मुलांचे सहभागी
पिंपळनेर । साक्री तालुक्यातील सामोडे येथे कन्या विद्यालयात दोन दिवसीय तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलीचे १९ संघ व मुलाचे ३४ संघ असे ५२ संघानी सहभाग नोंदविला. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद, कन्या विद्यालय सामोडे यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय खो-खो क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. १४ वयोगटातील मुलीचा गटात सायजाबाई माध्यमिक विद्यालय देवळीपाडा हा संघ विजयी तर नुतन मराठा विद्या मंदिर छडवेल कोर्डेचा संघ उपविजेता झाला. १७ वयोगटातील मुलीच्या संघात इंदिरा गांधी माध्यमिकमुलीची शाळा मांजरी हा विजेता संघ तर माध्यमिक विद्यालय फोफरे हा संघ उपविजेता झाला.
विजेत्या संघाचा गौरव
दुसर्या दिवसी मुलांच्या संघात १४ वयेगटात आ.मा.पाटील विद्यालय पिंपळनेर हा संघ विजयी तर महात्मा फुले विद्यालय जैताणे हा संघ उपविजेता ठरला. १७ वयोगटातील मुलांचा संघात नुतन माद्यमिक विद्यालय छडवेलकोर्डेचा संघांने विजेतेपद तर आ. मा. पाटील विद्यालय पिंपळनेर उपविजेतेपद पटकविले. कन्या विद्यालयाचे संस्थाअध्यक्ष दयाराम शिंदे व सचिव विनायक देवरे, वनश्री पुरस्कार प्राप्त वर्षा देवरे, संजय भामरे, डी.झेड.पाटील, ए.एस दहिवेलकर, जे.एन वाघ, बी.एन.पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा शिंदे, शरद शिंदे, प्रकाश शिंदे, हंसराज शिंदे, जयदया अद्यापक विद्यालयाचे अध्यक्ष अनिल शिंदे आदी उपस्थित होते.