तालुकास्तरीय योगा स्पर्धेत गुंजाळ शाळेची बाजी

0

जुन्नर । आळेफाटा येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत येथील जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून नऊ विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर होणार्‍या योगा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य ज्ञानेश्वर आरोटे यांनी दिली.

जे.व्ही.पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये या तालुकास्तरीय योगा स्पर्धांचे नुकतेच आयोजन केले होते. यामध्ये जे. आर. गुंजाळ विद्यालयातील प्रतीक्षा गोंदे, साक्षी भांबेरे, आरती मुकणे, धनश्री रावते, वैष्णवी डोळस, ज्योती शिंगाडे, मयुरी उंडे, ईश्वरी वाळूंज, अंजली फटांगरे, श्रद्धेय गाडेकर, ऋषिकेश सोमवंशी, सुजित गुंजाळ, प्रणीत कुर्‍हाडे, प्रीतम परिहार या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यापैकी 14 वयोगटातील मुलींमध्ये प्रतीक्षा गोंदे, धनश्री रावते व आरती मुकणे 17 वयोगटातील मुलींमध्ये ज्योती शिंगाडे, मयुरी उंडे व ईश्वरी वाळुंज या विद्यार्थिनींचा व मुलांमध्ये ऋषिकेश सोमवंशी, श्रद्धेय गाडेकर व सुजित गुंजाळ या विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर होणार्‍या योगा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप गुंजाळ, सचिव मीना गुंजाळ आणि प्राचार्य ज्ञानेश्वर आरोटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.