तालुकास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेत पंकज विद्यालयाचे यश

0

चोपडा । शहरातील पंकज उच्च माध्यमिक विद्यालयाचे पंचायत समिती आयोजित तालुकास्तरी वक्तृत्त्व स्पर्धेत यश मिळाले असून शाळेतील 12 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी पंकज पाटील याने दुसरा क्रमांक मिळविला आहे. पंकजने “स्वच्छेतेला जपू या, गाडगेबाबा जानू या” या विषयावर आपले प्रभावी वक्तृत्त्व सादर करून द्वितीय क्रमांक मिळवून जिल्ह्यास्तरीय पातळीवर निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल पंकज व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, संचालक पंकज बोरोले, नगरसेवक नारायण बोरोले, मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील यांनी अभिनंदन केने आहे.