तालुकास्तरीय शिक्षक तंत्रस्नेही प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

0

नवापूर । तालुकास्तरीय शिक्षक तंत्रस्नेही दोन दिवशीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनीताई नाईक यांच्या हस्ते सरस्वती मातेचा प्रतिमेचे पुजन व दिपप्रजवलन करून झाले. नवापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फ सु. ही. नाईक शिक्षणशास्ञ महाविद्यालयाचा सभागृहात शिक्षक तंत्रस्नेही प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटक व अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनीताई नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अजय पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, प्राचार्या डॉ लता सुरवाडे, उपशिक्षणाधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी डॉ राहुल चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रशिक्षण समन्वयक रमेश देसले उपस्थित होते

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवा
रजनी नाईक म्हणाल्या की, नवापूर तालुका शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरात जिल्ह्यात अग्रेसर व्हावा यासाठी सवार्ंनी प्रयत्न करावे. तालुक्यातील शाळा 100 टक्के डिजिटल झाल्या पाहीजे. डिजिटल तंत्रज्ञान शिक्षकांनी प्रशिक्षणाचा माध्यमातून शिकून त्याचा उपयोग विद्यार्थाचा सर्वागिण विकासासाठी करावा. यासोबत शिक्षकांनी शाळेचा परिसरात हागणदारी मुक्तीसाठी प्रचार प्रसार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. जि प मराठी मुलांच्या शाळेस के पी ट्रस्ट मुंबई यांनी डिजीटल वर्ग करण्यासाठी 2 लाख रुपये देणगी दिली आहे.

शाळांमध्ये डिजिटल वर्ग
उपशिक्षणधिकारी डॉ राहुल चौधरी म्हणाले की नवापूर तालुक्यातील 210 जिल्हा परिषद शाळा मध्ये डिजीटल वर्ग सुरू झाले. लवकरच 100 टक्के डिजीटल शाळा नवापूर तालूक्यात होतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी प्रशिक्षणास भेट देऊन मार्गदर्शन केले.

यांनी पाहिले कामकाज
याबाबत साधनव्यक्ती कमलेश पाटील, सुनील नहिरे, राहुल साळुंखे यांनी महिती दिली सुञसंचलन राहुल साळुंखे यांनी तर प्रास्तविक डॉ राहुल चौधरी यांनी केले तर आभार रमेश देसले यांनी मानले प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नवापूर पंचायत समिती चा शिक्षण विभागाचे सतीश रायते, एन वाय नेरे, ललित भामरे आदिनी प्रयत्न केले या नवापूर तालुक्यातील जि.प. शाळेचे शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते