तालुकास्तरीय स्पर्धांचा निकाल जाहीर

0

रावेर । पंचायत समितीच्या शिक्षण विभाग अंतर्गत स्वच्छता पंधरवडा शाळा स्तरावर साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत शाळा स्तरावर आणि तालुकास्तरावर विविध स्पर्धा, उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. शाळा स्तरावरील निबंध स्पर्धा दोन गटात व चित्रकला स्पर्धा एका गटात घेण्यात आली. त्यातून तालुकास्तरावर विद्यार्थी निवड करून जिल्हा स्तरावर चित्र व निबंध पाठवण्यात आले आहेत अशी माहीती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

तालुकास्तरीय निकाल
चित्रकला स्पर्धा (1 ली ते 5 वी ) गटात प्रथम -मयूरेश हेमंत बाणाईत -5 वी -सरदार जी जी हायस्कूल रावेर, द्वितीय -प्रांजल समाधान येवले -5 वी माध्यमिक विद्यालय कुंभारखेडा, तृतीय -निकिता विलास येवले -5 वी माध्यमिक विद्यालय कुंभारखेडा, निबंध स्पर्धेत गट 1 इयत्ता 6 ते 8 प्रथम -लुब्धा निलेश बोरोले -7 वी -धनाजी नाना विद्यालय खिरोदा, द्वितीय -सुमित जगदीश काकडे -6 वी शिवाजी हायस्कूल खानापूर, तृतीय-प्राची अनिल चौधरी -8 वी -एन जी पाटील माध्यमिक उदळी, गट 2 इयत्ता 9 ते 12, प्रथम -जयश्री भिकारी जामोदकर -11 वी -धनाजी नाना विद्यालय खिरोदा, द्वितीय -रोहित रवींद्र गोसावी -9 वी -सरदार जी.जी.हायस्कूल रावेर, तृतीय -नम्रता पांडुरंग पाटील -9 वी -नाना विष्णु पाटील विद्यालय सावदा हे विद्यार्थी यशस्वी झाले.