शिंदखेडा । शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित एम.एच.एस.एस. हायस्कुल व मीराबाई शाह कन्या विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थीनी हितश्री तुषार पाटील हिने 97.40 टक्के गुण मिळवून केंद्रातून प्रथम आली आहे. एम.एच.एस.एस माध्यमिक विद्यालयात 68 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेत पवार हेमंत मोतीलाल याने 92.60 टक्के गुण मिळवून प्रथम, नेरपगार अनिरुद्ध प्रमोद याने 89.60 टक्के गुण मिळवून दुसरा तर जोशी चेतन अनिल याने 88.60 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
गर्ल्स हायस्कुलचा निकाल 96 टक्के
संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलचा निकाल 96.99 टक्के लागला असून 133 पैकी 129 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यात केंद्रातून प्रथम क्रमांक हितश्री तुषार पाटील (97.40), व्दितीय क्रमांक पूजा सुभाष देसले (96.60), तृतीय पूजा रविंद्र साळवे (95.80) यांनी मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉ. रमेश देसले, सचिव आनंदा चौधरी, मुख्याध्यापक डी.सी. गिरासे आदींनी अभिनंदन केले आहे.
जनता हायस्कुलचा 100 टक्के निकाल
जनता हायस्कूलचा दहावी सेमी माध्यमचा निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक वाघ वंश प्रदीप (92.60) व सोनवणे धिरज लिलाचंद (92.60), द्वितीय क्रमांक देसले प्रफ्फुल्ल रविंद्र (91.80) व पाटील शिओंम प्रताब (91.80) तर तृतीय क्रमांक देसले सुवर्णा पंडीत (90.40) व ठाकरे अक्षय सिताराम (90.40) यांनी प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मनोहर गोरख पाटील, मुख्याध्यापिका एम.डी. बोरसे यांनी अभिनंदन केले आहे. व्ही.के. पाटील इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम क्रमांक दामिनी महेश राहेजा (94), व्दितीय क्रमांक मिनल नंदलाल ठाकरे (93.60) तर तृतीय क्रमांक सुजीतकुमार संजय पाटील (93.20) यांनी प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन व्ही.के. पाटील, सचिव माधुरी पाटील, प्राचार्या रेणूका मिश्रा आदींनी अभिनंदन केले आहे.