तालुका पुरवठा समिती सदस्यपदी मोनिका शेटे यांची निवड

0

शिरपूर । शिरपूर तालुका दक्षता पुरवठा समिती जिल्हा पुरवठा कार्यालय कडुन जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा आदेशाने व भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा शिफारस नुसार जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांचा सुचनेने जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ताञय बोरुडे यांनी येथील भाजपाच्या महीला नगरसेविका मोनिका रोहीत शेटे यांची या समितीवर सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन
त्यांच्या निवडीबद्दल केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे, रोहयो मंत्री ना.जयकुमार रावल, खा.डॉ.हिना गावीत, आ.अनिल गोटे, विभागीय संघटन मंत्री अ‍ॅड.किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी, विरोधी पक्ष नेते मोहन पाटील, जितेंद्र ठाकुर, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे , नगरसेवक चदंनसिंग राजपुत, राजु गिरासे, हेमंत पाटील, रोहीत रंधे, किरण दलाल, दिपक माळी, सुलोचना साळुंखे, हेमराज राजपुत, विक्की चौधरी, प्रशांत चौधरी, राधेशाम चौधरी, कृष्णा शेटे, जितेंद्र शेटे, अशोक भाऊ शेटे , दादा शेटे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

नागरिकांच्या अडचणी सोडविणार
यासमितीमार्फत शिरपुर तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थाच्या होणारा पुरवठा, त्यांचे नियमन व नागरिकांच्या अडचणी या समितीच्या माध्यमातून सोडवण्यात येतील या समितीमध्ये 9 जणांची निवड जाहिर करण्यात आली आहे. त्या भाजपा शहर सरचिटणीस रोहीत शेटे यांच्या धर्मपत्नी आहेत. मोनिका शेटे या प्रभाग क्र. 11 मधून नगरसेवका म्हणून निवडून आल्या आहे. महीलांचा विविध समस्या सोडवण्यात त्या अग्रेसर राहील्या आहेत. महीला दिनी विविध कार्यक्रम व स्पर्धा घेतात