तालुका पोलिस स्टेशनतर्फे सहा दिवसात 18 जणांवर कारवाई

0

जळगाव– सर्वत्र लॉकडॉऊन सुरु आहे. अत्यावश्याक सेवे व्यतिरिक्त बाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. असे असतांनाही आदेशाचे उल्लंघन करुन विनाकारण फिरणार्‍या 18 जणांवर तालुका पोलीस स्टेशनतर्फे कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अवघ्या सहा दिवसातील गुन्ह्यांची आकडेवारी आहे. कारवाईदरम्यान एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कुणीही विनाकारण बाहेर असे जिल्हाधिकार्‍याचे आदेश आहेत. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे, वासुदेव मराठे, महेंद्र सोनवणे, हिरालाल पाटील, विलास शिंदे, अनिल तायडे, विलास पाटील, प्रफुल्ल धांडे, अनिल मोरे, समाधान टहाकळे यांच्यासह तालुका पोलीस स्टेशनच्य कर्मचार्‍यांनी बंदोबस्तादरम्यान तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई केली. तसेच त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 30 मार्च रोजी सहा जणांवर, 31 रोजी दोन जणांवर, 3 एप्रिल रोजी चार जण, 6 रोजी 4 जण तर 9 एप्रिल रोजी 2 जणांवर अशाप्रकारे एकूण 18 जणांवर कारवाई करण्यात आली.

या नागरिकांवर झाली कारवाई

दिलीप वाघ रा. चंदूआण्णानगर, पुरूषोत्तम साळुंखे रा. खाटेनगर, सुरेश महाजन रा. सिंधी कॉलनी, अजय पाटील , दिलीप महाजन दोघे रा. खोटेनगर, दिपक माळी, हायवेदर्शन कॉलनी, संकेत महाले रा. पाळधी रा.धरणगाव, गणेश वाघ, इंद्रनिल सोसायटी, जळगाव, महमंद पिंजारी, शेख रऊफ शेख जलाल, दलशेर गुलाब शेख, सचिन खोडे सर्व रा. आव्हाणा ता.जळगाव, सागर सोनवणे, आकाश सोनवणे, निखील सोनवणे तिघे रा. कानळदा ता.जळगाव, विक्की शर्मा रा. हायवेदर्शन कॉलनी, जळगाव, विशाल सोनवणे रा. साई पॅलेस, जळगाव, देवेंद्र लोहार, निवृत्ती नगर अशा 18 जणांवर कारवाई करण्यात आली असून पोलीस कर्मचार्‍यांच्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.