धुळे । येख़िल तालुका वारकरी मंडळातर्फे 7 ते 16 मे असे 10 दिवसांचे बालसंस्कार शिबिराचे आयोजन तालुक्यातील मांजरोद येथील म.गांधी विद्यालयात करण्यात आले आहे. सनातन आर्य धर्म, संस्कृती, भजन, कीर्तन, नामस्मरण, अध्यात्मिक दैवी शक्ती तरुण पिढीला प्राप्त व्हावी. संस्कृतीचा विसर पडत चाललेली आजची पिढी अनेक व्यसनाने ग्रासली आहे.
बालवयात योग्य संस्कार होण्यासाठी शिबिर
बाल वयात चांगले संस्कार, धर्म पारायण, चारीत्र्यसंपन्न समाज, देव, देश व धर्म याबाबत माहिती व्हावी यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात 9 ते 20 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.शिबीरात सकाळ सतात दररोज सकाळी 6 ते 7 प्रार्थना, 7 ते 8.30 गीत संध्या, 8.30 ते 9अल्पोहार, 9 ते 10.30 गीतगायन, 10.30 ते 11.30 क्रांतीवीर व संतांच्या यशोगाथा, 11.30 ते 12 भोजन, 12 ते 3 विश्रांती, तर दुपार सत्रात 3 ते 5 मृदंग वादन प्रशिक्षण, 5 ते 6 हरीपाठ, 6 ते 7 देशी खेळ, शाखा, 7 ते 8 आरती, पसायदान, 8 ते 9 भोजन, 9 ते 10 मनोरंजन. दि. 6 रोजी शिबिरात येतांना बालकांनी सोबत ताट, वाटी, पेला, अंथरुण, आवश्यक कपडेे, पहिल्या दिवसाची शिदोरी सोबत आणावेत. शिबीरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून या शिबीरासाठी वढोदा येथील हभप ऋषीकेश महाराज, आळंदी येथील हभप वासुदेव महाराज, सागर महाराज आदी परिश्रम घेत आहेत.