तालुक्यातील एमआयडीसीतील कामगारांचे प्रश्‍न सोडवा

0

नवापुर । शहरात एम.आय.डी.सी त काम करणार्‍या नवापुर तालुक्यातील कामगारांचे प्रश्न सोडविणेबाबतचे निवेदन तहसिलदार प्रमोद वसावे यांना भिलीस्थान टाईगर सेनेतर्फे देण्यात आले. यावेळी न.पा गटनेता गिरीष गावीत उपस्थित होते. तहसिल कार्यालयाचा आवारात भिलीस्थान टाईगरसेनेचे कार्यकर्ते व कामगार लोकांनी गर्दी केली होती. त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे. तालुक्यातील बेरोजगार कामगार असुन आम्ही पुर्वीपासुन वेगवेगळया एम.आय.डी.सी.च्या खात्यामध्ये काम करीत आहे. यात काम करणारे युवक हे नवापुर तालुक्यातील असुन त्यांच्यावर मालकांची दडपणशाही चालते. एखादा कामगार आजारी राहिल्यास दुसर्‍या दिवशी त्या मजुरास कामावर घेत नाही. तरी मालकांच्या या मुजोरीला कंटाळलो आहे. तरी सद्यामालक हे परप्रांतिय लोकांना रोजगार देत आहे. तरी स्थानिक बेरोजगारांना काम देत नसल्याची तक्रार तहसिलदारांना करण्यात आली आहे.

स्थानिकांना प्राधान्य द्या
स्थानिकांना बेरोजगारांना रोजगार मिळवुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नविन चालु होणार्‍या कोणत्याही खात्यात पहिले स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे , कामगार आजारी असल्यास त्यांना नंतर कामावर घेण्यात यावे, कामगार हा फक्त एका शिफ्टमध्ये काम करेल जबरदस्ती करु नये, कामगारांना पगार हा महिन्याच्या 10 व 25 तारखेला देण्यात यावा,असे निवेदना मध्ये म्हटले आहे. निवेदनावर विजय गावीत,संजय मावची,दिनेश मावची,पिनेश गावीत,रसिलाल कोकणी,लाजरस गावीत,जालमसिंग गावीत, अनिल गावीत,अजय वळवी,जगदिश गावीत, असे 66 कामगारांचा सह्या आहेत.