तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यास मंजूरी

0

अमळनेर : तालुक्यातील पाणीटंचाई आराखड्यास 1 ऑक्टोबर पासून मंजुरी देण्यात आली असून 23 गावात 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून टंचाईची तीव्रता वाढल्याने 36 गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत तर तालीक्यातील संभाव्य यादीत 5 गावांचा समावेश करण्याची प्रस्तावित असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. अमळनेर तालुका गेल्या 3 वर्षांपासून अवर्षणप्रवण आहे यंदाही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे विहिरींची भुजल पातळी खालावून ती 2 मीटरपर्यंत खोल गेली आहे. तालुक्यातील तलाव, शेततळे हे नोव्हेंबर महिन्यातच कोरडे झाले आहेत पांझरानदी काठावरील गावे व तालुक्यातील काही गावे वेगळता सुमारे 36 गावात टँकर ने पाणीपुरवठा करणे सुरू आहे यात दुष्काळग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच काही गावात शिल्लक असलेला पाणीसाठा जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

या गावांचा आहे समावेश
भोरटेक, पिपळे खु, पिपळे बु, निसर्डी, ढेकू खुर्द, धानोरे, डांगर, धानोरा, सुंदरपट्टी, अटाळे, नगाव खु, जैतपीर, शिरसाळे, देवगाव देवळी, आर्डी, आनोरे, पिपळी प्रज, सारबेटे बु, गलवाडे बु, वाघोदे, गडखांब, कचरे या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु असून खेडी, खर्दे, टाकरखेडा, कावपिंप्री, धुपी ही पाच गावे नवीन पाणीटंचाई आराखड्यात प्रास्तावित आहेत. नविन आराखड्यानुसार मागील 23 गावांना 10 टँकरने तर 36 गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्याच यंदाही कायम करण्यात आल्या आहेत. नवीन टंचाईग्रस्त असलेली गावे नवीन आराखड्यानुसार ग्राह्य धरले जातील, अशी माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले.